Jhumkavali Pora song Poster esakal
नाशिक

Success Story: ‘हाई झुमकावाली पोरं’ 10 कोटी प्रेक्षकांच्या पसंतीला! ट्रेंड बदलणारे नाशिकचे विनोद, राणी कुमावत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिंदी चित्रपटातील गाण्यांना तोड देणाऱ्या अहिराणी गाण्यांनी सध्या अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. हाई झुमकावाली पोरं...हे गाणे तीन महिन्यांत १० कोटी लोकांनी बघितल्याने यू ट्यूबच्या टॉप १०० गाण्यांमध्ये सातव्या क्रमांकावर त्याचा समावेश होता.

महाराष्ट्रातील गाण्यांचा ट्रेंड बदलणारे हे गाणे नाशिकच्या विनोद कुमावत व राणी कुमावत या युवा कलाकारांनी निर्माण केले आहे. (Jhumkawali Pora liked by 10 crore viewers Trend changing from Nashik vinod and Rani Kumawat Success Story nashik news)

अहिराणी गाण्यांची उत्तर महाराष्ट्रात चलती असून, युवकांना वेड लावणारी अनेक गाणी या भाषेत तयार झाली आहेत. नाशिकमधील बॉश व पीव्हीजी कंपनीत सुमारे दहा वर्षे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या विनोदला ‘टिकटॉक’चे वेड होते. रिल्स बनवत असताना त्यांनी गाणे तयार करण्याचा निर्णय घेतला.

सोबतीला भय्या मोरे हा मित्रही होता. दोघांनी एकत्रितपणे 'हाई झुमकावाली पोरं' हे गाणे बसवले. त्याला समीर के. एस. यांनी चपखल संगीत दिले. या गाण्यात मुख्य कलाकार म्हणून विनोद कुमावत आणि राणी कुमावत यांनी काम केले.

भय्या मोरे व अंजना बर्लेकर यांनी गायलेल्या या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. रूपेश पाईकराव व संतोष राठोड यांनी कोरिओग्राफर म्हणून किती मेहनत घेतली आहे, हे गाण्याच्या प्रसिद्धीवरुन दिसून येते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

यू ट्यूबवर स्वत:च्या नावाचे चॅनल सुरु करुन विनोदने तीन वर्षांत चार सुपरहिट गाणे दिले. यात 'कर मना लगन' या गाण्याला ५ कोटी तर, मोबाईल वाली साली या गाण्याला साडेतीन कोटी ‘व्हूज’ मिळाले. इतकेच नव्हे तर 'हाई झुमका वाली पोरं' हे फिमेल गाणेही एक कोटी लोकांपर्यंत पोहोचले आहे.

तीन महिन्यांत या गाण्याने विनोद व राणीला स्टार तर बनवलेच शिवाय आता मोठ्या सेलिब्रिटीप्रमाणे त्यांना कार्यक्रमांचे निमंत्रण येऊ लागले आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रच नाही तर छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, येथेही त्यांच्या गाण्याचा जलवा दिसून येतो. राज्यभर गाजत असलेल्या या गाण्यांचा ट्रेंड नाशिकच्या युवा कलाकारांनी सेट केला आहे.

लवकरच ‘पोरं शे तू बिंदीवाली’

हाई झुमकावाली पोरं हे गाण्याने प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर विनोद कुमावत आता ‘पोरं शे तू बिंदीवाली’ हे नवीन गाणे घेऊन येत आहेत. लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Live Updates : वैशाली जिल्ह्यातील कोणत्या जागेवर कोणी विजय मिळवला?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT