दोनशेच्या नोटांची छपाई सुरू

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

कशी असेल दोनशेची नोट?
रिझर्व्ह बॅंकेकडून दोनशे रुपयांच्या नोटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नोट कशी असेल याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र इंटरनेटवर दोनशेची नोट हिरव्या आणि जांभळ्या रंगात दाखवण्यात आली आहे. मात्र त्याबद्दल अजुन कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मुंबई/कोलकता - नोटाबंदीनंतर दोन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने दोनशे रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरवात केली आहे. यामुळे ग्राहकांना चलन तुटवड्याची समस्या कमी होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दोनशेच्या नोटा चलनात येणार आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वीच दोनशे रुपयांच्या नोटेचा प्रस्ताव सादर केला होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रस्तावानंतर दोनशेच्या नोटा छपाईला सुरवात केली आहे.  जुलै महिन्यात या नोटा चलनात आणण्याचे सरकारने उद्दीष्ट ठेवले आहे. मात्र आणखी काही काळ नोटा छपाईला लागणार असल्याने प्रत्यक्ष चलनात येण्यास विलंब होणार आहे. आरबीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दोन हजाराची नोट चलनात आल्यानंतर त्याचे सुटे पैसे देण्यासाठी समस्या निर्माण होत असल्याने लहान पाचशेपेक्षा लहान मूल्याची नोट नोटेची मागणी सर्वच स्तरांतून केली जात होती. त्यावर सकारात्मक विचार करून, दोनशे रुपयांची नोट चलनात आणली जात असल्याचे बोलले जात आहे.

कशी असेल दोनशेची नोट?
रिझर्व्ह बॅंकेकडून दोनशे रुपयांच्या नोटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नोट कशी असेल याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र इंटरनेटवर दोनशेची नोट हिरव्या आणि जांभळ्या रंगात दाखवण्यात आली आहे. मात्र त्याबद्दल अजुन कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पाक सैन्याच्या गोळीबारात दोन जवान जखमी

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी