'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

309 प्लॅन - 309 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी 4 जी डेटा 6 महिने मिळणार आहे. यामध्ये 28 दिवसाच्या रिचार्जच्या हिशोबाने 6 मोफत रिचार्ज सायकल असेल. म्हणजेच ग्राहकाला 168 जीबी डेटा मिळणार आहे. 

मुंबई : धन धना धन ऑफर संपण्यापूर्वीच रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीच धमाकेदार ऑफर देऊन दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडवली आहे. आता या नवीन ऑफर आणून कंपनीने इतर कंपन्यांपुढे आव्हान उभे केले. नवीन देऊ केलेल्या ऑफरमध्ये जिओ 224 जीबीपर्यंत 4जी डेटा देणार आहे. 

चालू महिन्यात (जुलै) जिओची 'धन धना धन ऑफर' संपणार आहे. त्यामुळे आता जिओच्या ग्राहकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावे लागणार आहे. आता नवीन प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना नवीन जिओ फाय किंवा नवीन सिम खरेदी करावे लागणार आहे. यासाठी ग्राहकांना 99 रुपयांची प्राईम मेंबरशिप देण्यात येणार आहे. त्यानंतर 149, 309 आणि 509 या पैकी एका प्लॅनची ​​निवड करावी लागणार आहे.

काय आहेत नवीन प्लॅन:
1) 149 प्लॅन  -149 रुपयांच्या प्लॅनमध्ये दरमहिन्याला 2 जीबी 4 जी डेटा एक वर्षापर्यंत मिळणार आहे. शिवाय यासाठी 12 विनामूल्य रिचार्ज सायकल असेल. 

2) 309 प्लॅन - 309 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी 4 जी डेटा 6 महिने मिळणार आहे. यामध्ये 28 दिवसाच्या रिचार्जच्या हिशोबाने 6 मोफत रिचार्ज सायकल असेल. म्हणजेच ग्राहकाला 168 जीबी डेटा मिळणार आहे. 

3) 509 प्लॅन - 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 4 महिने रोज 2 जीबी 4 जी डेटा मिळणार आहे. यासाठी 4 रिचार्ज सायकल असतील. म्हणजेच 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये 224 जीबी डेटा मिळणार आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​