बेळगावमध्ये 1250 सफाई कामगारांना कावीळ प्रतिबंधक लस

मल्लिकार्जुन मुगळी
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

16 ते 19 आॅगस्ट या काळात सर्व सफाई कामगारांच्या कुटुंबीयांनाही कावीळ प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

बेळगाव : बेळगाव शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या सुमारे 1250 सफाई कामगारांना महापालिकेकडून शुक्रवारी कावीळ प्रतिबंधक लस देण्यात आली. महापालिकेकडे 250 नियमित तर 1089 कंत्राटी सफाई कामगार आहेत. या सर्व कामगारांना लस देण्यात आली.

16 ते 19 आॅगस्ट या काळात सर्व सफाई कामगारांच्या कुटुंबीयांनाही कावीळ प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुक्रवारी महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष राजू बिर्जे, आयुक्त शशीधर कुरेर, आरोग्याधिकारी डाॅ. शशीधर नाडगौडा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सफाई कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिकेकडून नियमित व कंत्राटी सफाई कामगारांना अपघात विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सफाई कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना दहा लाखाची भरपाई मिळणार आहे. त्याची माहिती यावेळी सफाई कामगाराना देण्यात आली. 2011 साली कामगारांना कावीळ प्रतिबंधक लस देण्यात आली होती. सहा वर्षानंतर यंदा ही लसूण देण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या :