Eye
Eye Sakal

डोळ्यात टाकलं हार्पिक अन् झंडूबाम; लुटण्याचा नवीन फंडा

या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय महिला केअरटेकरला अटक केली आहे.

हैदराबाद : डोळ्यात मिरची पावडर किंवा इतर पदार्थ टाकत नागरिकांना किंवा ज्येष्ठांना लुटल्याच्या घटना आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण हैदराबाद (Hyderabad) येथे चक्क एका ज्येष्ठ नागरिकाची (Senior Citizen ) काळजी घेणाऱ्या केअरटेकरने (Care Taker) चक्क हार्पिक आणि झंडूबाम डोळ्यात टाकत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय महिला केअरटेकर पी भार्गवीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत अमर उजालाने वृत्त प्रकाशित केले आहे. (Harpic and Zandubam Used For Eye Drop)

Eye
MRF Tyres : मुलांसाठी फुगे ते देशातील नंबर वन टायर उत्पादक

प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार सिकंदराबाद येथील 73 वर्षीय हेमवती नचाराम येथील एका अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहतात. तर त्यांचा मुलगा लंडनमध्ये राहतो. दरम्यान आईची काळजी घेण्यासाठी हेमवती यांचा मुलगा शशिधर यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पी भार्गवी यांची आईची काळजी घेण्यासाठी ठेवले. त्यानंतर आरोपी महिला तिच्या सात वर्षांच्या मुलीसोबत हेमवती यांच्यासोबत राहू लागली.

Eye
Ukraine : ...म्हणून भारत उचलतोय सावध पावलं, ही आहेत 5 मोठी कारणं

दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये, पी भार्गवीला हेमवती यांनी डोळ्यात (Eye) औषध घालण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी महिलेने बाथरुम स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे हार्पिक आणि झंडू बाम पाण्यात मिसळून हेमवती यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी हेमवती यांनी मुलाला डोळ्यात संसर्ग (Eye Infection) झाल्याचे सांगितले असता त्यांना मुलीसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे (Eye Specialist) जाण्यास सांगितले. यानंतर पीडित महिलेची दृष्टी ज्यावेळी पूर्ण गेली त्यावेळी हेमवती यांच्या मुलाने त्यांना डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी डोळ्यात विषारी द्रव्य टाकल्याने त्यांची दृष्टी गेल्याचे सांगितले.

Eye
Russia Ukraine War Live : रशियाने युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्प घेतला ताब्यात

त्यावेळी कुटुंबीयांना केअरटेकरवर संशय आल्याने त्यांनी याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चौकशीअंती आरोपी महिलेने हेमवती यांच्या डोळ्यात हार्पिक आणि झंडूबाम टाकत असल्याचे तसेच रोख 40,000 रुपये, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोनीची चेन आणि इतर दागिने चोरल्याचे कबूल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com