हरियाना: व्हिडिओ 'व्हायरल' झाल्याने गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

कुरुक्षेत्र (हरियाना): लाडवा भागातील जिंदाल पार्कमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्यानंतर याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरुक्षेत्र (हरियाना): लाडवा भागातील जिंदाल पार्कमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्यानंतर याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या व्हिडिओत जिंदाल पार्कमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला काही जण मारहाण करीत असल्याचे दिसते; तसेच ती तरुणी मारहाण न करण्याची विनंती करीत असताना काही जण मारहाण करीतच या घटनेचे चित्रीकरण करीत असल्याचेही दिसत आहे. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली. अखेर पोलिसांनी या तरुण-तरुणीला मारहाण करणाऱ्या पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: