काश्मीरमध्ये एका दहशवाद्याचा खात्मा, दोघे फरार

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

भारतीय फौजांनी या भागाला पहाटेच वेढा देऊन दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यास सुरवात केली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बामनू भागात भारतीय सुरक्षा फौजांनी सकाळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. आणखी दोन दहशतवादी पुलवामात लपल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा शोध अद्याप घेण्यात येत आहे. 

दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची चाहूल लागताच सोमवारी पहाटे भारतीय सुरक्षा फौजांनी या परिसराला वेढा दिला, असे पोलिस खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. मारण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, किफायत असे त्याचे नाव आहे. या ठिकाणी शोध मोहीम अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सुरक्षा फौजांनी या भागाला पहाटेच वेढा देऊन दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यास सुरवात केली होती. ही मोहीम सुरू असून, याबाबतचा आणखी तपशील अद्याप प्रतीक्षेत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​

देश

नवी दिल्ली : मागणीअभावी अर्थव्यवस्थेतील मंदी आणि त्यामुळे विकासदरावर होणारा परिणाम याची चिंता सरकारला भेडसावते आहे. त्यामुळे यावर...

07.09 AM

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

05.03 AM

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017