पाकच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

जम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला, तर एका हमालाचाही मृत्यू झाला.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी पूँचमधील कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये काल (ता. 11) रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला, तर एक हमालही गोळीबारात ठार झाला. पाकिस्तानकडून तीन, चार आणि सहा ऑक्‍टोबरलाही या भागात शस्त्रसंधीचा भंग झाला होता. 2017 या वर्षांत शस्त्रसंधी भंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :