जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

जयपुर पोलिस हे चांगले आहे की देशासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्याचे आपण किती आदर राखता. पण, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या कामावेळी होत असलेल्या चुकांची खिल्ली उडविणार नाही. कारण, मला माहिती आहे चुका या माणसाकडूनच होतात.

जयपूर - जयपूर पोलिसांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या नो बॉलचे वाहतूक नियमांसाठी वापर केल्याने बुमराहने याबद्दल ट्विटरवरून नाराजी दर्शविली आहे. यानंतर पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.

बुमराहने पाकविरुद्धच्या सामन्यात रेषेबाहेर पाय टाकल्याने नो बॉल देण्यात आला होता. याचा वापर करत जयपूर पोलिसांनी रेषेबाहेर गेल्यानंतर मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगचा आदर राखा असे पोस्टर्स शहरभर लावले होते. या पोस्टर्सवर बुमराहचा तो चेंडू आणि झेब्रा क्रॉसिंग असे लावण्यात आले होते.

यावर बुमराहने प्रतिक्रिया देताना म्हटले, की जयपुर पोलिस हे चांगले आहे की देशासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्याचे आपण किती आदर राखता. पण, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या कामावेळी होत असलेल्या चुकांची खिल्ली उडविणार नाही. कारण, मला माहिती आहे चुका या माणसाकडूनच होतात.

बुमराहच्या नाराजीनंतर जयपूर पोलिसांनी त्याची माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे, की जसप्रीत तुला दुखःवण्याचा हेतू नव्हता. वाहतुकीबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी आम्ही हे वापरले. तुम्ही कोट्यवधी युवकांचे आदर्श आहात.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​
वादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​