अमरनाथ: त्या दहशतवादी हल्ल्यामागे "लष्करे तैयबा'च

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी अमरनाथ यात्रेसाठी तीन हजारांपेक्षाही जास्त भाविक रवाना झाले. ही यात्रा पूर्ण करण्यापासून कोणतेही संकट रोखू शकत नसल्याची भावना यांपैकी बहुसंख्य भाविकांनी व्यक्‍त केली

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला "लष्करे तैयबा' या कुप्रसिद्ध दहशतवादी संघटनेने घडविला असल्याची माहिती राज्यातील पोलिस दलाने दिली आहे. अबु इस्माईल या पाकिस्तानी दहशतवाद्याने या हल्ल्याची योजना आखली होती.

दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी अमरनाथ यात्रेसाठी तीन हजारांपेक्षाही जास्त भाविक रवाना झाले. ही यात्रा पूर्ण करण्यापासून कोणतेही संकट रोखू शकत नसल्याची भावना यांपैकी बहुसंख्य भाविकांनी व्यक्‍त केली.

अमरनाथ यात्रेकरुंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्ला हा काश्मीरी नागरिक आणि मुस्लिमांवर कलंक असल्याची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आठ वाजून 20 मिनिटांनी अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पळून जाऊ लागले. पळून जाताना त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याच वेळी अमनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरूंची एक बस त्या भागात आली. दहशतवाद्यांनी त्या बसवरही बेछूट गोळीबार केला. ही बस सोनमर्ग होऊन येत होती. यात्रेसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन बस चालकाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. सायंकाळी सात वाजल्यानंतर यात्रेसाठीच्या कोणत्याही वाहनाने प्रवास करण्यास मज्जाव आहे. मात्र हा नियम चालकाने धुडकावल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​