...तर तुमच्या बायकोला विकून टाका: जिल्हाधिकारी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

घरात शौचालय नसल्यामुळे स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावे लागते. त्यामुळे महिलांना त्रासाला समोर जावे लागते, अनेकदा त्यांच्यासोबत बलात्कारासारखे प्रसंग घडतात. शौचालय उभारण्यासाठी फक्त 12 हजार रुपये खर्च आहे. पत्नीच्या प्रतिष्ठेपुढे 12 हजार रुपयांची काय किंमत आहे.

औरंगाबाद - तुम्ही तुमच्या पत्नीसाठी घरामध्ये शौचालय बनवू शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या बायकोला विकून टाका, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या प्रचारासाठी सरकारी अधिकारी काम करत असताना एका जिल्हाधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याने चक्क पत्नीसाठी शौचालय बनवू शकत नसल्यास तिलाच विकण्याचा सल्ला दिला आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील जामहोर गावात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कंवल तनूज यांनी हा अजब सल्ला गावकऱ्यांना दिला. 

तनूज म्हणाले, की घरात शौचालय नसल्यामुळे स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावे लागते. त्यामुळे महिलांना त्रासाला समोर जावे लागते, अनेकदा त्यांच्यासोबत बलात्कारासारखे प्रसंग घडतात. शौचालय उभारण्यासाठी फक्त 12 हजार रुपये खर्च आहे. पत्नीच्या प्रतिष्ठेपुढे 12 हजार रुपयांची काय किंमत आहे. केंद्र सरकार घरात शौचालय बांधण्यासाठी मदत देऊ करत आहे. पण, तुमची घरात शौचालय बांधण्याची मानसिकताच नसेल तर पत्नीला विकून टाका. 

तनूज यांच्या या वक्तव्यामुळे समाजवादी पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तनूज हे आयएएस अधिकारी असून, त्यांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवे होते, असे सप नेत्याने म्हटले आहे. 

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :