सावंतवाडी: ग्रामपंचायतीच्या त्रासामुळे 17 कुटुंबे दहशतीखाली

अमोल टेंबकर
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी समाज बांधवासमवेत भेट घेतली. गेले पाच ते सहा वर्षे हा प्रकार सुरु आहे. संबधित कुटुंबांना वीज, पाणी नाही त्यामुळे काय करावे या विवंचनेत कुटुंबे आहेत.

सावंतवाडी : देवसू येथील धनगर समाजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्रास देण्यात येत आहे. समाज बांधव राहत असलेली घरे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या भागातील अनेक घरांना घरपट्टी तसेच घरपत्रक उतारे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येते. परिसरातील 17 कुटुंबे दहशतीखाली आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांचे आदेश धाब्यावर बसविण्यात आले आहेत. पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी आरोप केला आहे.

पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी समाज बांधवासमवेत भेट घेतली. गेले पाच ते सहा वर्षे हा प्रकार सुरु आहे. संबधित कुटुंबांना वीज, पाणी नाही त्यामुळे काय करावे या विवंचनेत कुटुंबे आहेत. या संदर्भात मडगावकर म्हणाले, संबधितांना घरे मिळणे गरजेचे आहे. अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासाकडे दाद मागू असे आश्वासन मडगावकर यांनी दिले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :