दोन गवे विहिरीत पडले; एकाचा मृत्यू

अमोल टेंबकर
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

हा प्रकार सकाळी तेथील कामगाराच्या लक्षात आला. त्याने याची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावपळ उडाली.

सावंतवाडी : येथील बाहेरचावाडा परिसरातील गोविंदचित्र मंदिराच्या मागील बाजूस दोन गवे विहीरीत पडले. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला. यातील एका गव्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केले होते.

गावाला लागून असलेल्या बाहेरच्या भागात पालकमंत्री दीपक केसरकर कुंटेबियांची जमीन आहे. या जमिनीत असणाऱ्या विहिरीत रात्री हे गवे कोसळले होते. हा प्रकार सकाळी तेथील कामगाराच्या लक्षात आला. त्याने याची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावपळ उडाली.

दरम्यान, पाणी खोल असल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या गव्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी पालिका कर्मचारी आणि वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. ते काही दिवस शहराला लागून असलेल्या नरेंद्र डोंगर परिसरात हे गवे आढळून आले होते. या भागात ते संचार करत होते. पाच गव्यांचा कळप शहरात वास्तव्य करून आहे. तेथील एका जवळचा आज मृत्यू झाला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :