पाली पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

अमित गवळे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पाली (रायगड): सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाने मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंचांची खोटी सही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप गजानन वाडेकर (रा. करजंघर) यांनी केला असून सबंधीत ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी केली आहे. या मागणीसाठी वाडेकर पाली सुधागड पंचायत समिती कार्यालयासमोर आज (सोमवार) उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते वाडेकर यांना मानवी अधिकार, नागरी हक्क संरक्षण संघ रायगड यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

या प्रकरणातील ग्रामसेवकाची चौकशी होवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वाडेकर यांनी पाली सुधागड गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन ग्रामसेवकाने २४ मार्च २०१५ च्या मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंच सुलभा पवार यांची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर यांनी केला आहे. याबाबत २१ मार्च २०१६ रोजी पाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. अनेकदा तक्रारी अर्जाद्वारे सबंधीत ग्रामसेवकावर कारवाई करण्या बाबतची मागणी लावून धरली असताना देखिल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

खवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुलभा पवार यांनी देखिल मासिक सभेतील इतिवृत्तावर मी सही केली नाही असा दावा केला आहे. व उपोषणकर्ते वाडेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी उपोषणकर्ते गजानन वाडेकर यांच्या समवेत खवली ग्रा.पं. माजी सरपंच सुलभा पवार, नागरीहक्क संरक्षण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्षा जानवी मेस्त्री, नागरी हक्क संरक्षण संघाचे अलिबाग तालुकाध्यक्ष किशोर पाटील, दिपक तरंगे, कमलाकर पाटील, चंद्रकांत टाकळेकर, माधुरी बोरीटकर, सदाशिव नाडकर, अरुण खराडे, संतोष बोरीटकर, गणपत पवार आदिंसह ग्रामस्त उपस्थीत होते.

गजाजन वाडेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी महेश गबाडी यांच्या अधिपत्याखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. यासंबंधात सबंधीत सरपंच, ग्रामसेवक व उपोषणकर्ते यांचे जबाब घेण्यात आले आहेत. स्वाक्षरीबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी पुणे येथील हस्ताक्षरतज्ञ यांच्याकडे सदर नमुने पाठविण्यात येणार आहेत. तद्नंतर उपलब्द होणार्‍या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी, सुधागड-पाली पंचायत समिती

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :