शिवसेना गांडूळासारखी आहे: अजित पवार

सुचिता करमरकर
शनिवार, 8 जुलै 2017

मध्यावधी निवडणूकांची शक्यता अजित पवार यांनी फेटाळून लावली. हे दोन्ही पक्ष पंधरा वर्ष विरोधात होते, त्यामुळे सत्ता सोडण्यासारखी परिस्थिती ते निर्माण करतील मात्र तसे प्रत्यक्ष करणार नाहीत असे पवार यांनी सांगितले. मुंबई पालिकेतील घोषणाबाजीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

कल्याण : शिवसेना गांडूळासारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जेष्ठ नेते गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव उपस्थित होते. कल्याण, उल्हासनगर तसेच भिवंडी शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी सत्तेत असलेल्या सेना भाजपवर सडकून टीका केली.

सेनेवर टीकास्त्र सोडताना अजितदादांनी सेना म्हणजे गांडूळ असल्याचे म्हटले. यावर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले कि, मी शेतकरी आहे, त्यामुळे मी अशीच उदाहरणे देत असंतोष. आमच्या शेतात मी पाहिलेलय गांडूळ दोन्ही दिशांना चालते. सेनेचं सध्या तेच चालू आहे, असे पवार म्हणाले.

मंत्रीमंडळात बसून निर्णय घ्यायचे आणि त्यांच्या नेत्यांनी दुसरचं बोलायचं, म्हणजेच दोनही बाजूने बोलत रहायचे असा सेनेचा पावित्रा असल्याने आपण त्यांना गांडूळ म्हटल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सेनेने दुटप्पी राजकारण करु नये अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी बँकांबाहेर ढोल वाजवण्याच्या सेनेच्या भूमिकेची त्यांनी खिल्ली उडवली. ढोल वाजवायचे असतील तर ते मंत्रालयात वाजवा असा सल्लाही त्यांनी सेनेला दिला.

मध्यावधी निवडणूकांची शक्यता अजित पवार यांनी फेटाळून लावली. हे दोन्ही पक्ष पंधरा वर्ष विरोधात होते, त्यामुळे सत्ता सोडण्यासारखी परिस्थिती ते निर्माण करतील मात्र तसे प्रत्यक्ष करणार नाहीत असे पवार यांनी सांगितले. मुंबई पालिकेतील घोषणाबाजीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना नेवाळीचा विषय नव्हता असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शेतकरी कर्जमाफी प्रकरणात सरकारच्या सूचना स्पष्ट नसल्याचे अजित पवार म्हणाले. यामुळेच सरकारी अधिकारी तसेच बँकांना नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सिलेंडरच्या ट्रकवर चढून मद्यपी चालकाची स्फोटाची धमकी

आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

महाराष्ट्र

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM

मुंबई - राज्यात राबवण्यात येणाऱ्या "ग्राम सामाजिक परिवर्तन मोहिमे'ला (व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन मिशन) गती देण्यासाठी...

04.33 AM