गृहनिर्माणमंत्री मेहतांनी दिलेल्या परवान्यांच्या चौकशीचे आदेश

टीम ई सकाळ
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

लोकायुक्तांना निर्देश द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर राज्यपालांनी हे आदेश दिले आहेत. 

मुंबई : मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड येथील झोपडपट्टी पुनवर्वसन योजनेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेल्या वादग्रस्त परवानग्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज लोकायुक्तांना दिले. 

राज्यपालांनी या प्रकरणाची चौकशी होण्याबाबत लोकायुक्तांना निर्देश द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर राज्यपालांनी हे आदेश दिले आहेत. 
राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते की, मेहता यांनी या योजनेमध्ये दिलेल्या परवानग्यांवरून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी लोकायुक्तांवर देण्यात येईल. 

महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा 1971 मधील कलम 17 अंतर्गत उपकलम 3 नुसार चौकशी करण्याचे हे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी