Pushpa Movie: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे. तिच्या अल्लु अर्जुनसोबतच्या (Allu Arjun) पुष्पाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता सध्या तिच्या नव्या रिलेशनशिपविषयी बोलले जात आहे. (Tollywood News) त्यातच तिच्या लग्नाच्या चर्चेलाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोण आहे रश्मिकाचा बॉयफ्रेंड असा ट्रेंडदेखील सोशल मीडियावर सुरु झाला होता. विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि रश्मिका आता लग्न करणार असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेडमध्ये या दोन्ही कलाकारांनी काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.
गेल्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजयच्या नावाची मोठ्या (Rashmika Mandana Wedding) प्रमाणावर चर्चा सुरु आहे. रश्मिकानं काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केलं आहे. तर मुंबईमध्ये विजय आणि रश्मिकाला डेट करत असल्याचे फोटोग्राफर्सनं पाहिलं आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावरुन व्हायरल झाले आहे. गोव्यातील एका ट्रीपवरुन रश्मिका आणि विजयच्या रिलेशनशिपला चर्चा सुरु झाली. गोव्याला विजयचा भाऊ आनंद आणि रश्मिका यांनी न्यु इयर सेलिब्रेशन केले होते. अभिनेता विजय आणि त्याची आई यांच्यासोबत रश्मिकाचे चांगले संबंध आहे. तिची सर्वांशी ओळख असल्याचे सांगितले जाते.
रश्मिकाच्या रिलेशनशिप विषयी सांगायचे झाल्यास, तिचा 2017 मध्ये रक्षित शेट्टीसोबत साखरपूडा झाला होता. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या अगोदरच त्यांच्या नात्यामध्ये वाद निर्माण झाला होता. ज्याचा परिणाम त्यांच्या लग्नाच्या निर्णयावर झाला. अखेर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांचा साखरपूडा होऊन लग्न झाले नाही तेव्हा रश्मिकाला मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. यावेळी रश्मिकानं आपल्या मनोगतात सांगितलं होतं की, मला लोकांनी ट्रोल करणं बंद करावं. त्यांना अनेक गोष्टी काही माहिती नाहीत. त्यामुळे मला खूप त्रास होतो. असे ती म्हणाली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.