'दशक्रिया'विरोधात आयनॉक्समध्ये घोषणाबाजी

'दशक्रिया'विरोधात आयनॉक्समध्ये घोषणाबाजी
'दशक्रिया'विरोधात आयनॉक्समध्ये घोषणाबाजी

ब्राह्मण संघटना आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने

औरंगाबाद: दशक्रिया चित्रपटातून ब्राह्मण समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करत ब्राह्मण संघटनांनी आज (शुक्रवार) प्रोझोन मॉलमध्ये सिनेमाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्राह्मण संघटना व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र चित्रपट सुरूच राहिला.

प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित 'दशक्रिया' चित्रपटाविरोधात ब्राह्मण संघटना गेले काही दिवस आंदोलन, निवेदने आणि घोषणाबाजी करत होत्या. हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशा मागणीची निवेदनेही त्यांनी चित्रपटगृह मालक व व्यवस्थापनाला दिली. त्यामुळे शहरात आयनॉक्स वगळता अन्यत्र कुठेही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. प्रोझोन मॉलमध्ये आयनॉक्स मल्टिप्लेक्सने दुपारी साडे बाराला शो जाहीर केला. यावेळी ब्राह्मण व पुरोहित संघटनांचे कार्यकर्ते त्याठिकाणी जमले. यात ब्राह्मण समन्वय समितीचे वनिता पत्की, आशिष सुरडकर, पंकज पाठक, जिल्हा पुरोहित संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुळे, युवराज दिवेकर, स्वप्नील जोशी, अभिषेक कादी आदींनी जय परशुराम, जय भवानी जय शिवाजी, सनातन हिंदू धर्म की जय, अशा जोरदार घोषणा देत शो बंद करण्याची मागणी केली. यावेळी प्रा. शिवानंद भानुसे यांच्या नेतृत्वात तिथे आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मात्र चित्रपट सुरूच ठेवण्याची मागणी करत घोषणा दिल्या.

चित्रपटगृह व्यवस्थापनाने सुरवातीला शो बंद करत असल्याचे सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. शंभरावर प्रेक्षकांनी मात्र थिएटरमध्ये या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा आनंद लुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com