रावते यांनी एसटीत प्रचंड भ्रष्टाचार सुरु केलाः छाजेड

रावते यांनी एसटीत प्रचंड भ्रष्टाचार सुरु केलाः छाजेड
रावते यांनी एसटीत प्रचंड भ्रष्टाचार सुरु केलाः छाजेड

औरंगाबाद : परिवहन मंत्री दिवाकर रावते सुडबुद्दिचे राजकरण करत आहेत, त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार सुरु केला, असा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) अध्यक्ष माजी आमदार जय प्रकाश छाजेड़ यांनी केला.

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) विस्तारित राज्य स्तरीय कार्यकारिणी बैठकीत त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. रावते यांच्यामुळेच एसटी कर्मचारी संप झाला. शिवसेना प्रमुख असते तर रावते यांना हे कळले असते. महामंडळात प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. शिवशाही बसमध्ये प्रचंड भष्ट्राचार केला आहे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्या श्रेयवादच्या लढाईत, कर्मचाऱ्यांना संप करवा लागला. न्यायालय आदेश प्रमाणे 10 जानेवारी पर्यंत वेतनाचा प्रश्न सोड़वायचा आहे. पण, रावते यांच्या वर संक्रांत येणार आहे. भ्रष्ट माणूस आमच्याशी काय लढणार. ज्या दिवशी राजकीय लढाई सुरु होईल, त्या दिवशी रावते यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा छाजेड़ यांनी दिला.

दिवाकर रावते यांनी संप फोडण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिली होती, असाही आरोप छाजेड यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com