घनशी नदीत वाहून गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

प्रविण फुटके
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

घटनास्थळापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी हे मृतदेह सापडले.

परळी : येथील घनशी नदीत पोहण्यासाठी गेलेले सरस्वती विद्यालयाचे नववीतील दोन विद्यार्थी काल वाहून गेले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आज (ता. १२) सकाळी सापडले.

कालपासून ही शोध मोहीम सुरु होती. आज सकाळी घटनास्थळापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी हे मृतदेह सापडले. उमेश बबन चाहुलकर (वय १३, फुले नगर) व राष्ट्रपाल बबन गायकवाड (वय १३) अशी त्यांची नावे आहेत.

या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी गेलेला शाहेद जावेद कुरेशी (वय २२) याचा दरम्यान कालच (ता. ११) मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परळी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

टॅग्स