जालन्याजवळ ट्रॅव्हल्सचा अपघात; एक ठार, 29 जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

चिंतामणी ट्रॅव्हल्सची गाडी पुणे येथून नागपूरकडे निघाली होती. गुरुवारी (ता.28) पहाटे ही गाडी औरंगाबाद-जालना राष्ट्रीय महामार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ आल्यानंतर पलटी झाली.

जालना :औरंगाबाद-जालना महामार्गावर गुरुवारी (ता.28) पहाटे चारच्या सुमारास झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये एक जण ठार तर 29 जण जखमी झाले आहेत. यातील सहा जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्सच्या दोन पटल्या होऊन ती पुन्हा रस्त्याच्या खाली उभी राहिली. 

चिंतामणी ट्रॅव्हल्सची गाडी पुणे येथून नागपूरकडे निघाली होती. गुरुवारी (ता.28) पहाटे ही गाडी औरंगाबाद-जालना राष्ट्रीय महामार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ आल्यानंतर पलटी झाली. या ट्रॅव्हल्सने दोन पटल्या घेऊन ती पुन्हा उभा राहिली. यामध्ये आतिष जैन (वय 24, रा. अमरावती) हे जागीच ठार झाले. तर इतर 29 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान हा अपघात गाडीचे ब्रेक जाम झाल्याने झाल्याचं चालकानी सांगितले आहेत. याप्रकरणी चंदनझिर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेणे सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: