नांदेड वाघाळा महापालिकेत राहणार काँग्रेसचेच वर्चस्व...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे शेवटच्या टप्यात सभा घेतली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केली होती.

नांदेड : राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेत ४३ जागांवर विजय मिळवून काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. दुपारी २.३० वाजेपर्यंत जाहिर झालेल्या ४७ जागांपैकी ४४ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले.  

प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपला केवळ तीन, तर शिवसेना व अपक्षाकडे प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. तसेच आणखी १५ जागांवर काँग्रेस तर भाजप दोन व शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे. नांदेड वाघाळा महापालिकेच्या ८१ जागांसाठी बुधवारी (ता. ११) मतदान झाले. गुरुवारी (ता.१२) सकाळी १० वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. नांदेडकरांसोबतच संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले होते. दुपारपर्यंतच्या जाहीर निकालावरून कँग्रेसला सत्तास्थापनेसाठी कोणाच्याही टेकुची गरज भासणार नाही, हे स्पष्ट होत आहे. 

केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने नांदेडची महापालिकाही आपल्याच ताब्यात
घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. परंतु, त्यांचे नेतृत्व नांदेडकरांनी नाकारले आहे. दुपारी एक पर्यंत केवळ एका जागेवरच भाजपला समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेली वैयक्तिक टिका भाजपला भोवल्याचे बोलले जात आहे. भाजपने नांदेड ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांचाच या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे.
 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :