93 बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

टीम ई सकाळ
बुधवार, 28 जून 2017

कोण होता मुस्तफा डोसा 
दाऊद टोळीचा विश्वासू हस्तक. मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मोठा भाऊ मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन यांच्यासह मुस्तफादेखील प्रमुख सूत्रधार. दुबईत राहून संपूर्ण कट आखणार्‍या मुस्तफाला २००४ मध्ये 'इंटरपोल'च्या सततच्या मागणीमुळे दुबई पोलिसांकडून अटक. त्यानंतर त्याला भारतीय तपासयंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले.

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसा याचा आज (बुधवार) उपचारादरम्यान जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. 

प्रकृती अस्वस्थामुळे आज पहाटे त्याला मुंबईतील जे. जे. रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातील जेल वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. ताप आणि छातीत दुःखू लागल्याची तक्रार केल्याने तुरूंगाधिकाऱ्यांनी पहाटे तीन वाजता त्याला रूग्णालयात आणले होते. हायपरटेंशन आणि वाढलेल्या मधुमेहाच्या त्रासावरही त्याच्यावर उपचार सुरू होते. डोसावर उपचार सुरु असल्याचे जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुस्तफाच्या छातीतही संसर्ग झाला होता. सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांनी मुस्तफा आणि फिरोजची 93 च्या बॉम्बस्फोटातील भूमिका स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले देत शिक्षेच्या युक्तिवादात विशेष टाडा न्यायालयात कठोरात कठोर मृत्यू दंडाची अर्थात फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. 

बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 ला पाडली. त्याचा बदला घेण्यासोबतच देशाची आणि विशेषतः मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, या उद्देशाने हे स्फोट घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा न्यायालयाने मान्य केला होता. या बॉंबस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

कोण होता मुस्तफा डोसा 
दाऊद टोळीचा विश्वासू हस्तक. मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मोठा भाऊ मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन यांच्यासह मुस्तफादेखील प्रमुख सूत्रधार. दुबईत राहून संपूर्ण कट आखणार्‍या मुस्तफाला २००४ मध्ये 'इंटरपोल'च्या सततच्या मागणीमुळे दुबई पोलिसांकडून अटक. त्यानंतर त्याला भारतीय तपासयंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज
1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​