फिटच्या आजाराने 14 वर्षीय अनाथ मुलाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

दीपक तायडे असे या मुलाचे नाव असून तो कॅम्प नं. 3 येथिल पवई चौक परिसरातील सरस्वतीनगर येथे मामा हिरा आडाव यांच्याकडे राहत होता. दिपक याला आईवडील नसून मामा त्याचा सांभाळ करीत होते. बुधवारी सायंकाळी 4  च्या सुमारास दिपक हा त्याच्या तीन मित्रांसोबत सोबत महापालिकेच्या हिराघाट येथील बंद पडलेल्या बोट क्लबमध्ये साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेला होता. ​

उल्हासनगर - आईवडील नसलेल्या आणि मामा संगोपन करत असलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा फिटच्या आजाराने  उल्हासनगर महापालिकेच्या बंद पडलेल्या बोटक्लबमध्ये बळी गेल्याची दुर्दैवी घटना  घडली आहे.तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असतानाच फिट रुपी काळाने त्याच्यावर झडप घातली आहे. त्यामुळे बोटक्लबच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दीपक तायडे असे या मुलाचे नाव असून तो कॅम्प नं. 3 येथिल पवई चौक परिसरातील सरस्वतीनगर येथे मामा हिरा आडाव यांच्याकडे राहत होता. दिपक याला आईवडील नसून मामा त्याचा सांभाळ करीत होते. बुधवारी सायंकाळी 4  च्या सुमारास दिपक हा त्याच्या तीन मित्रांसोबत सोबत महापालिकेच्या हिराघाट येथील बंद पडलेल्या बोट क्लबमध्ये साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात आंघोळ करीत असताना अचानक त्याला फिट आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी घरी जाऊन त्याच्या मामाला या घटनेची माहिती दिल्याने त्यांच्यासह नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या दिपक याचा शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह पाण्यात मिळून आला. दिपक याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक येवले करीत आहेत. या घटनेमूळे पवई हिराघाट परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

दरम्यान पालिकेची बोटक्लब प्रशस्त जागेत वालधुनी नदीच्या बाजूला आहे.येथे पिकनिक स्पॉट तयार करण्याचा पालिकेचा बेत होता.महाशिवरात्री च्या जत्रे प्रसंगी या बोटक्लब मध्ये गर्दी होते.मात्र पाणी नसल्याने ही बोटक्लब बंद असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसतात.सहज उड्या मारून किंबहुना कंपाऊंड वर चढून आत जाणे शक्य असल्याने बच्चे कंपनी बोटक्लब मध्ये साचलेल्या पाण्यात आंघोळ करतात.सुरक्षा रक्षक तैनात असते तर अनाथ दीपक तायडे सोबत ही दुर्दैवी घटना घडली नसती असे बोलले जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

टॅग्स