वडिलांनी CPR देऊन वाचवले दीड महिन्याच्या बाळाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई : अँब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून CPR देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणलं, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षाच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या CPR मुळेच मुलाचे प्राण वाचवणं शक्य झाल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बिस्वा पांडा यांनी सांगितले. 

मुंबई : अँब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून CPR देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणलं, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षाच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या CPR मुळेच मुलाचे प्राण वाचवणं शक्य झाल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बिस्वा पांडा यांनी सांगितले. 

दीड महिन्याच्या बाळाला 15 दिवस तापासाठी उपचार सुरू होते. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मिरारोड येथील सक्सेना रुग्णालयाने बाळाला उपचार देण्यास नकार दिला. त्यानंतर बाळाचे वडील गुड्डू चौधरी यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यानंतर उमराव हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला मुंबईच्या वाडीया किंवा के.ई.एम रुग्णालायच नेण्यास सुचवलं. 3 जूनच्या रात्री बाळाची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने गुड्डू यांनी खासगी वाहनातून मुलाला वाडिया रुग्णालयात आणलं. रस्त्यात बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे गुड्डू यांच्या लक्षात आले. तेव्हा गुड्डू यांनी बाळाला सीपीआर दिला. 10-15 मिनिटांच्या अंतराने तोंडाने श्वास दिला. बायकोला हाता पायाला चोळायला सांगितलं. 
याबाबतचा वृत्तांत पाहा सकाळ फेसबुक LIVE वर.

त्या रात्री बाळाला वाडिया रुग्णालयात आणल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याबरोबरच त्याच्या तपासण्या आणि चाचण्या सुरू झाल्या. यावेळी बाळाच्या हृदयात 2.3 से.मी बाय 2.3 सेमी. बाय 2.3से.मी. आकाराचा ट्युमर बाळाच्या हृदयातून काढला. 

बाळावर शस्त्राक्रिया करणारे डॉ बिस्वा पांडा यांच्या म्हणण्यानुसार बाळाला सीपीआर दिल्यामुळे बाळाची प्रकृती चांगली राहिली आणि म्हणून शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 6 तास ही शस्त्रक्रिया झाली. पण 15 दिवस बाळाला झालेल्या तापाने बाळाच्या यकृत, मुत्रपिंड आणि फुप्फुसांवर परिणाम झाला होता. त्यामुळे रिकव्हरीसाठी बाळाने 10-12 दिवसांचा अवधी घेतला. डॉ चुंडाल विल्सन यांच्या म्हणण्यानुसार असा दोष मोठ्या माणसांमध्ये प्रामुख्याने आढळतो. लहान मुलांमध्ये असा दोष आढळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 1% मुलांमध्ये असा दोष आढळतो. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

टॅग्स