कोकणातील गणेशभक्तांसाठी कल्याण, विठ्ठलवाडीतून विशेष बससेवा

रविंद्र खरात 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कोकणात गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्त येथील नागरीक आपल्या परिवारासहीत कोकणात जातो .

कल्याण : दरवर्षी कोकणात गणेशोत्सव निमित्त जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या  जास्त असते  कल्याण आणि विठ्ठलवाड़ी एसटी डेपो मधून यावर्षी विशेष 200 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून त्याचे तिकीट आरक्षण शंभर टक्के पूर्ण झाले असून प्रवासी वर्गासाठी परतीच्या प्रवाससाठी एसटी बस सेवा उपलब्ध केल्या आहेत . 

कल्याण पूर्व पश्चिम, विठ्ठलवाड़ी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, मोहना, टिटवाला, ठाकुर्ली, शहाड, डोंबिवली परिसरामध्ये कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. कोकणात गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्त येथील नागरिक आपल्या परिवारासहीत कोकणात जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कल्याण आणि विठ्ठलवाड़ी एसटी डेपो मधून विशेष बस सोडण्यात येणार आहे . विठ्ठलवाड़ी एसटी डेपो मधून 22 मार्गावर 140 जादा एसटी बसेस तर कल्याण एसटी डेपो मधून 16 मार्गावर 60 जादा एसटी बसेस अश्या एकूण 200 बसेस सोडण्यात येणार आहे. 

कोकणात परिवारासहित गेलेल्या गणेश भक्ताची परत येण्याची गैरसोय होवू नये म्हणून एसटी महामंडळाने कल्याण, डोंबिवली आणि विठ्ठलवाडी एसटी डेपो आणि खासगी एजंटकडे रत्नागिरी, देवरुख, कणकवली, गुहागर, चिंद्रावळे, चिपळूण, दापोली, खेड  एसटी डेपोमधून परतीच्या तिकीट आरक्षण मिळण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती कोकण प्रवासी संघटना अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी दिली आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM