एमआयएमकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड

अनिल जमधडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आमदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंळाचा धुडगुस

औरंगाबाद : राज्यात सुरु भारनियमन सुरु असतानाच, औरंगाबादेत भारनियमानाच्या विरोधात एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

आमदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंळाचा धुडगुस

औरंगाबाद : राज्यात सुरु भारनियमन सुरु असतानाच, औरंगाबादेत भारनियमानाच्या विरोधात एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

आमदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखालील पाचशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भारनियमानाच्या विरोधात महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयावर आज (शुक्रवार) मोर्चा काढला. जमावाला पाहून सुरक्षा रक्षकांनी गेट बंद केले, मात्र कार्यकर्त्यांनी कंपांडवॉलच्या जाळ्या तोडून मध्ये प्रवेश मिळवला, त्यानंतर कार्यालयाच्या आवारातील महावितरचे विविध जाहिराती व माहिती देणारे फलक तोडून टाकले, दगडफेक करत इमारतीच्या खिडक्‍यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर कार्यकर्ते मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यालयात घुसले, मात्र श्री. गणेशकर कार्यालयात नव्हते. कार्यकर्त्यांनी दालनात घुसण्यापुर्वी बाहेरच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. मध्ये शिरल्यानंतर आम्ही विजेअभावी तफडफत असताना तुम्ही एसीमध्ये बसता कसे असे म्हणत, त्यांच्या दालनातील एसी तोडला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत टेबलवरची काच फोडली फर्निचरची तोडफोड केली. अनेक वेळ कार्यकर्ते घोषणा देत होते. काही वेळानंतर महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बोकोरिया आले, त्यांनी आमदार इम्तीयाज जलील यांच्याशी चर्चा केली. व्यवस्थापकीय संचालकांशी फोनवरुन बोलल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर लोडशेडींग बंद करण्याचे अश्‍वासन दिल्यानंतर कार्यकर्ते निघुन आले. हा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरुच होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad news MIS dissolution of the office of mahavitaran