पंढरपूरः चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्‍यता (व्हिडिओ)

अभय जोशी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पंढरपूर: पुणे जिल्ह्यासह उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून गुरुवारी (ता.14) रात्री 70 हजार क्‍यूसेस भिमानदीत सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून 14 हजार क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू आहे. पुढील काही दिवसात राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उजनी व वीर धरणातील विसर्ग वाढून चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. नीरा खो-यातील नीरा-देवधर, भाटघर आणि वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून 14 हजार क्‍यूसेस विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला आहे. तर दौंड येथून भिमा नदीपात्रात 42 हजार क्‍यूसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत 70 हजार क्‍युसेसचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचा नृसिंहपूर येथे संगम होत असून, त्यामुळे सध्या भिमा नदीपात्रात सुमारे 84 हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे येथील दगडी पूल पाण्याखाली गेला असून, पुंडलिक मंदिर व लगतच्या सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही धरणातील विसर्ग वाढल्यास चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्‍यता आहे.