भाजपचे लोक महापालिकेला खटकतातः सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सव्वा वर्षात महापौरांनी एकदाही बोलावले नाही

सांगली: सांगलीचा भरभरून विकास व्हावा, हे आदर्श शहर व्हावं, असं आम्हाला मनापासून वाटतं. परंतु, भाजपचे लोक महापालिकेत आलेले तिथल्या कारभाऱ्यांना खटकतात. गेल्या चौदा महिन्यांपासून मी पालकमंत्री आहे, महापौरांनी एकदाही मला पालिकेत बोलावले नाही, असा टोला पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी बोलताना हाणला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर त्यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्‍नांवर पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील विस्तारीत भागाचे पावसाने बेट झाले आहे, लोक पाण्यात राहताहेत, दलदलीत जगताहेत, तुम्ही काहीच का करत नाही? महापालिका निवडणुकीपर्यंत वाईटच होत रहावे, असे भाजपला वाटतेय का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "असं वाटायचं काहीच कारण नाही. महापालिकेत आम्हाला कधीच बोलावले गेले नाही. विकासाबाबत चर्चा केली गेली नाही. आमचे लोक कधी गेले तर त्यांना ते खटकते. याचा अर्थ सरळ आहे, त्यांना आम्ही चालत नाही. आम्ही काही करायला गेलो तर ते प्रतिसाद देत नाहीत.''

शेतकरी कर्जमाफीवर ते म्हणाले, "कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. पोशिंदा जगला पाहिजे, यासाठी महसूल यंत्रणा रात्रीचा दिवस करून काम करेल. या सात दिवसांत जे अर्ज भरतील त्यांना कर्जमाफी मिळेल. दिवाळी गोड होईल, मात्र अर्ज भरा. या कर्जमाफीतील कुठलाही निकष किचकट नाही. जेकाही बोगज अर्जदार असतील त्यांची पडताळणी योग्य पद्धतीने केली जाईल.''