महाजनांच्या आरोपांवर RR आबांच्या कन्येचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पारदर्शक व स्वच्छ चारित्र्याने राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर.आर. यांच्यावर असे गंभीर आरोप झाल्याने त्याच्या सत्यतेबाबत आज राज्यस्तरावर चर्चा सुरु झाली.

सांगली : माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर. पाटील यांच्या बंधूंच्या नावावरील 80 लाखांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आज तासगाव तालुक्‍यात उमटले. आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप सिध्द करा अन्यथा अंजणीत येऊन आबांच्या समाधीजवळ माफी मागा असे आव्हान दिले. 

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री महाजन यांनी हा सनसनाटी आरोप केला होता. पारदर्शक व स्वच्छ चारित्र्याने राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर.आर. यांच्यावर असे गंभीर आरोप झाल्याने त्याच्या सत्यतेबाबत आज राज्यस्तरावर चर्चा सुरु झाली. दोन दिवसापुर्वी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मागील कर्जमाफीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील कर्जमाफीत युतीच्या अनेक नेत्यांची कर्जे माफ झाल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढताना मंत्री महाजन यांनी आरआर यांच्या बंधूच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री महाजन यांनी आपली टिका पोकळ नसून त्यासाठी पुरावे असल्याचा दावाही केला आहे. 

महाजन यांच्या टिकेने घायाळ झालेल्या आबांच्या कन्या स्मीता यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन पुरावे द्या अन्यथा माफी मागा असे जाहीर आव्हान दिले. त्यांच्या आव्हानावर आता मंत्री महाजन कोणते पुरावे सादर करतात हे पहावे लागेल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :