तासवडे, किणी टोलनाक्यांवर फास्टटॅग यंत्रणेमुळे होणार सुसाट प्रवास

तानाजी पवार
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

फास्टटॅग धारकांना दरमहा मिळणार साडेसात टक्क्यांची सूट, योजनेचा लाभ घेण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आवाहन

फास्टटॅग धारकांना दरमहा मिळणार साडेसात टक्क्यांची सूट, योजनेचा लाभ घेण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आवाहन

वहागाव (सातारा): टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा फास्टटॅग योजनेत सहभागी होऊन सुसाट जाण्याची संधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांचा अमूल्य वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आता टोलनाक्यावर फास्टटॅग योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सातारा ते कागल या मार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवर ही योजना सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर विविध ठिकाणी टोल आकारणी केली जाते. टोल देण्यासाठी वाहनधारकांना रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. याचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत टोल रक्कमेचा आगाऊ भरणा करुन वाहनधारकांना टॅग दिला जातो. हा टॅग वाहनांच्या पुढील काचेवर बसविण्यात येतो. हा टॅग सर्व टोलनाक्यावर उपलब्ध आहे. आपण टोलनाक्यांवरुन किती वेळा ये-जा करतो, त्यानुसार या रक्कमेतून टोलची रक्कम कपात केली जाते. टॅगचे पैसे संपताच पुन्हा पैसे भरुन टॅग रिचार्ज करता येतो. टोलनाक्यावर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फास्टटॅग लावण्यात आलेल्या सर्व वाहनांसाठी प्रत्येक टोलनाक्यावर स्वतंत्र लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या लेनमध्ये टॅग लावलेल्या वाहनांचा प्रवेश होताच अॅटोमेटिक बूमच्या साहाय्याने आपल्या वाहनास ग्रीन सिग्नल मिळतो. विशेषत: फास्टटॅग लावण्यात येणाऱ्या वाहनांना टोलच्या दरात साडेसात टक्के कॅशबॅक सवलत दिली जाते. याशिवाय आपल्या टॅगमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, किती रक्कम कपात झाली आहे, याचीही माहिती मिळते. सातारा ते कागल या मार्गावरील तासवडे व किणी या दोन्ही टोलनाक्यांवर ही योजना सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे व तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी