पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात एक जण ठार

जनार्दन दांडगे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

आज पहाटे अडीचच्या सुमारास झालेला हा अपघात एवढा भीषण होता, की नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कार (MH 23 AK 3888) झाडावर आदळून नाल्यात कोसळली. या अपघातात 1 जण ठार झाला असून, संदिपान भगवान शिंदे (वय 60 रा. बीड) असे यांचे नाव आहे.

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवलीजवळ आज (बुधवार) पहाटे इनोव्हा गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीचच्या सुमारास झालेला हा अपघात एवढा भीषण होता, की नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कार (MH 23 AK 3888) झाडावर आदळून नाल्यात कोसळली. या अपघातात 1 जण ठार झाला असून, संदिपान भगवान शिंदे (वय 60 रा. बीड) असे यांचे नाव आहे.

या अपघातात सुभाष साहेबराव जगताप (वय 70 वर्षे रा. बीड), किसन जठार (वय 71 रा. बीड), मुक्ताराम किसन तावरे (वय 71) हे जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :