वीज अंगावर कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

टाकवे बुद्रुक (पुणे): शेळया मेंढयांची राखण करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून तिचा जागेवरच मृत्यू झाला, पोपटाबाई दादू सप्रे असे मेंढया राखणाऱ्या महिलेचे नाव आहे.

टाकवे बुद्रुक (पुणे): शेळया मेंढयांची राखण करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून तिचा जागेवरच मृत्यू झाला, पोपटाबाई दादू सप्रे असे मेंढया राखणाऱ्या महिलेचे नाव आहे.

आंदर मावळातील कल्हाटच्या तासूबाई डोंगरावर रविवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोपटाबाई या शेळया मेंढया चारून माघारी निघाल्या होत्या. मेघगर्जनेसह धो-धो कोसळणारा पाऊस आणि वीजेच्या कडकडाटाने सह्याद्रीच्या कडेपठार उजळून निघत होता. वीजेच्या कडकडाटात त्यांच्या कोसळल्याने येथे प्रत्यक्ष पाहणारे पोपटाबाई सप्रे यांचे पती दादू सप्रे व सून मंगल सप्रे यांची बोबडी वळली. या डोंगरावर ठाकर समाजाची ८ ते १० घरांची वस्ती आहे. शेळया-मेंढया हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. घरातील कर्ती महिला गेल्याने कुटुंबियांचा आधार हरपला आहे.

दरम्यान, या परिसरात संपर्काचे कोणतेच साधन नसल्याने हाती पर हाती निरोप देत कल्हाटकरांना या घटनेची माहिती रात्री अकराच्या सुमारास समजली. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून अंत्यसंस्कार केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :