पोलिसांना हरवलेल्या पाळीव कुत्र्यांचाही घ्यावा लागणार शोध

संदीप जगदाळे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): जर्मन शेफर्ड जातीचा अडीच वर्षांचा टायसन नावाचा पाळीव कुत्रा हरविल्या बाबतचा तक्रारी अर्ज हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. आता या टायसनला शोधायचे कुठे? असा यक्ष प्रश्न पोलिसांपुढे उभा ठाकला आहे. एकीकडे घरातील मनुष्य हरवल्याच्या अनेक लोक तक्रारी पोलिस ठाण्यात करतात. मात्र, घरातील पाळीव कुत्रा हरवतो व त्याची तक्रार मालक पोलिस ठाण्यात करतो, यामुळे पोलिसही आवाक झाले आहेत. आता पोलिसांना माणसांबरोबरच हरवलेल्या पाळीव जनावरांचा शोध घ्यावा लागणार आहे. याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

याबाबत टायसनचे मालक नितीन शिंदे (रा. रिव्हर पार्क, सोनारपूल, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार अर्ज केला आहे. शिंदे यांच्या तक्रार अर्जानुसार, या अडीच वर्षांच्या टायसन कुत्र्याला ते गेली अनेक महिने सांभाळत होते. बावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून तो अचानक घरासमोरून बेपत्ता झाला. त्याचा कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्यांनी टायसन हरविल्या बाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.

टायसन हा कुत्रा अत्यंत रूबाबदार व देखणा असल्याने त्याला परिसरातील अनेक लोक शिंदे यांना विकत मागत होते. मात्र, तो आमच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग होता व त्याचा लळा घऱातील सर्वांना लागला होता. त्यामुळे आम्ही त्याला विकत नव्हतो. टायसनला विकत मागणा-यांपैकी काही लोकांनी त्याला चोरलेला असावा संशय शिंदे यांनी तक्रार अर्जात व्यक्त केला आहे. तसेच आमच्या लाडक्या टायसनला शोधून आमच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती पोलिसांना त्यांनी केली आहे. या तक्रार अर्जावर सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news Police will also have to search for missing pet dogs