पुणे: पाणी पुरवठा योजनेच्या निविदा अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे: शहरातील समान पाणी पुरवठा (24×7) योजनेच्या सुमारे 1800 कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सुमारे 27 टक्के जादा दराने या निविदा आल्या होत्या. त्या रद्द कराव्यात, अशी मागणी महापालिकेतील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांची चर्चा झाल्यावर निविदा रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार या बाबत गुरुवारी औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :