वाघोली (पुणे): पुणे-नगर महामार्गावर आज (शुक्रवार) सकाळी पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केसनंद येथील सत्संग कार्यक्रमामुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने ही वाहतूककोंडी झाली होती.
पोलिस, ब्यासचे कार्यकर्त्यांनी वाहतूक नियंत्रणाचे प्रयत्न केले. मात्र, वाहनांची संख्याच एवढी हेाती की त्यांचे नियोजनही कोलमडून पडले. या कोंडीत सत्संग प्रमुख गुरिंदर सिंगजी धिल्लेान महाराज यांनाही अडकावे लागले.
राधा स्वामी सत्संग ब्यासच्या वतीने केसनंद येथील केंद्रात सत्संगचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत हा सत्संग कार्यक्रम होता. यासाठी देशभरातून त्यांचे अनुयायी आले होते. सकाळी सहा वाजल्यापासुन अऩुयायी येण्यास सुरुवात झाली. पुणे-नगर महामार्गावर वाहतुक नियोजनासाठी ब्यासचे कार्यकर्ते सकाळी सहा वाजल्यापासून चौकाचौकात उभे होते. मात्र, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे नियेाजन कोलमडून नगरकडे जाणार्या मार्गावर वाहतूककोंडी झाली. खराडी बायपास चौकापासून बीजेएस कॉलेज पर्यंत वाहनांची रांग लागली हेाती.
अकरा वाजण्याच्या सुमारास सत्संग प्रमुख गुरिंदर सिंगजी धिल्लेान महाराज हे कार्यक्रम ठिकाणी जाण्यास निघाले. मात्र, त्यांनाही वाघोलीतील साईसत्यम पार्क पासून कोंडीत अडकण्याची वेळ आली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱया पोलिसांच्या वाहनांनी त्यांना कसेबसे कोंडीतून बाहेर काढून कार्यक्रम ठिकाणी पोहचविले. वाघोली ते केसनंद रोडवरही कोंडी झाली होती. सन 2012 मध्ये केसनंद येथे सत्संग कार्यक्रम झाला हेाता. त्यानंतर पुन्हा आज पाच वर्षानी हा कार्यक्रम झाला.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.