जिल्हा परिषदेतील शाळांच्या भिंती चित्रातून लागल्या बोलू

युनूस तांबोळी
शुक्रवार, 21 जुलै 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): निर्सगाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी हात चालले आहे. पाण्याची पातळी खोलवर जाऊ लागली आहे. त्यामुळेच प्रदुषण टाळत पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा संदेश देत लोकसहभागातून जिल्हा परिषदेतील शाळांच्या भिंती चित्रातून बोलक्या होऊ लागल्या आहेत.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): निर्सगाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी हात चालले आहे. पाण्याची पातळी खोलवर जाऊ लागली आहे. त्यामुळेच प्रदुषण टाळत पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा संदेश देत लोकसहभागातून जिल्हा परिषदेतील शाळांच्या भिंती चित्रातून बोलक्या होऊ लागल्या आहेत.

डोंगरगण (ता. शिरूर) शिवनगर प्राथमिक शाळेत किचनशेड उभारण्यात आले आहे. कमी जागेत उत्तम पद्धतीने हे किचनशेड उभारण्यात आले आहे. या शेडच्या भिंती पाणी वाचविण्याचा संदेश देताना दिसतात. या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे व त्यांच्या पत्नी शिक्षीका मनिषा घोडे यांनी या शाळेचे रूप पालटण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसहभागातून त्यांना चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. चौथी पर्यंत असणाऱ्या या शाळेत जवळपास 45 विद्यार्थी शिक्षण घेताना दिसतात. या किचनशेड समोर मुलांना जेवनासाठी टेबल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथे सामुहिक स्नेह भोजनाचा आनंद मुले घेताना दिसतात. या किचनशेड वर पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला आहे. यावर पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे. त्याबरोबर हाथ धुण्याचा प्रकार चित्रातून दाखविण्यात आला आहे.

लोकसहभागातून येथील शाळेत कुपनलीका बसविण्यात आली आहे. चुकून विद्यार्थ्याने येथील कुपनलीकेतून पाणी सांडले तर ते पाणी शाळेभोवती असणाऱ्या बगीचा मध्ये जाते. त्यातून या परीसरात उत्तम असा बगीचा तयार करण्यात आला आहे. या बगीचामध्ये विद्यार्थ्यांना आर्युवेदिक औषधे, विविध फुले व फळझाडाची माहिती मिळण्यास मदत होते. या झाडांच्या बुध्यांला लहानसे मडके ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्यात या मडक्यात पाणी टाकले की झा़डांना पाणी मिळण्यास मदत होते. येथील बगीचा फुलला असल्याने पक्षांचा किलबिलाट नेहमी दिसून येतो. त्यामुळे निसर्गरम्य शाळेचे दर्शन येथे घडताना दिसते. त्यामुळे या शाळेकडे पदाधिकारी व अधिकारी यांच्या भेटी अधिक होताना दिसते.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: