शिवसेना त्यातली नाहीः संजय राऊत

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

खडकवासला (पुणे) : "राज्यात देशात अनेक प्रश्न आहेत. शिवसेना ही जनतेचा प्रश्नावर कायम आंदोलन किंवा प्रश्न उपस्थित करीत राहणार आहे. याबद्दल देश राज्यातील कोणताही पक्ष बोलणार नाही. कारण सत्तेने त्या सगळया पक्षाचे गळे दाबले आहेत. शिवसेना त्यातली नाही." असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

खडकवासला (पुणे) : "राज्यात देशात अनेक प्रश्न आहेत. शिवसेना ही जनतेचा प्रश्नावर कायम आंदोलन किंवा प्रश्न उपस्थित करीत राहणार आहे. याबद्दल देश राज्यातील कोणताही पक्ष बोलणार नाही. कारण सत्तेने त्या सगळया पक्षाचे गळे दाबले आहेत. शिवसेना त्यातली नाही." असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानंतर, ते प्रथमच पुण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावर एक कार्यालयात कोथरूड, खडकवासला व वडगाव शेरी या विधानसभा मतदार संघ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका मंगळवारी घेतल्या.  त्यानंतर 'सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे शहराचे संपर्क प्रमुख आमदार उदय सामंत, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शर संघटक श्याम देशपांडे, जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे, संपर्क प्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख रमेश कोंडे, तालुका प्रमुख नितीन वाघ, संदीप मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यातील एक भाग म्हणून माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र यातील काही जिल्हाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जुन्नर व रायगड भागात काल होतो. आज पुण्यात आहे. असे सांगून राऊत म्हणाले, "हा सर्व परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काही जागा आमच्याकडे यापूर्वी देखील आमच्याकडे होता. येथे आमचे संघटन आहे. पक्ष व नेतृत्वाला मानणारा वर्ग आहे. काही ठिकाणी नवीन तयारी करायची आहे. संघटनात्मक बदल देखील केले जाणार आहेत."

24 तासात यादी जाहीर करू
‎शिवसेना नेते व खासदार संजय राऊत म्हणाले की, विधानसभेचा उमेदवार लवकर ठरविण्यासाठी कार्यकर्ते व उमेदवाराला वेळ मिळावा. याचा आराखडा नेतृत्व करीत आहे. निवडणूका आल्या की, उमेदवारांची भाऊगर्दी होती. कोणता उमेदवार द्यायचा, याचा घोळ कार्यकर्ते व नेतृत्व कार्यकर्ते यांच्यात होतो. तो थांबवायचा आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणूक कधी ही जाहीर झाल्या तरी शिवसेनेची उमेदवारांची यादी 24 तासात जाहीर करू. या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या दृष्टीने काम केले जात आहे."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :