'अगं माझ्या लाडाची हौसा आतातरी माझ्याशी गोड बोलना'

सुदाम बिडकर
गुरुवार, 27 जुलै 2017

पारगाव (पुणे) : 'सोनू तुझा मायावर भरवसा नाय का' या गीताने गेली काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अक्षरशा धुमाकुळ घातला आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातही या गाण्याचा ट्रेंड पहावयास मिळत आहे. या गाण्याची भुरळ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी वर पडली असून, सातंत्र्यदिनाच्या संचलनाचा सराव करताना सोनू या गाण्याच्या चालीवर आधारीत 'अगं माझ्या लाडाची हौसा आता तरी माझ्याशी गोड बोलना' हे गाणे म्हणत संचलनाचा जोरदार सराव करत आहे.

'सोनू' या गाणे यु ट्युब वर व्हायरल झाल्यानंतर हे गाणे महाराष्ट्रासह शेजारील राज्यात चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या गाण्याच्या चालीवर मध्यंतरी आरजे मलिष्काने मुबंई महानगर पालिकेवर विडंबनात्मक गाणे तयार केले ते सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर बरेच वादंग झाले. त्याला प्रत्युतर म्हणून शिवसेनेच्या नगरसेविकेने तशाच प्रकारच्या गाण्यातून उत्तर दिले होते. विधानसभेच्या पावसाळी आधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील विरोधी पक्षांनी सोनू गाण्याचा वापर करुन सत्ताधार्यांवर टिका केली होती.

या गाण्याचा ट्रेंड आता शाळेतील विद्यार्थींनी पर्यंत पोचला आहे. मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थींनी क्रीडा शिक्षणाच्या तासाला कवायतीचे वेगवेगळे प्रकार करताना अथवा संचलनाचा सराव करताना 'सोनू' या गाण्याच्या चालीवर तयार केलेले 'अगं माझ्या लाडाची हौसा आतातरी माझ्याशी गोड बोलना' हे गाण सामुदायिक मोठ्या आवाजात म्हणतात हे गाणे म्हणत असताना आम्हाला सराव करताना कंटाळा येत नाही तसेच शिस्तबध्द सराव होतो, अशी प्रतीक्रीया या विद्यार्थीनींनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: