पुणे : पानशेत धरणातून सोडले पाणी

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

आज (सोमवार) सकाळी मागील 24 तासात टेमघरला 54, पानशेतमध्ये 48, टेमघरला 51 मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला 86 टक्के, वरसगाव 87 तर टेमघर 41 टक्के भरले आहे. पानशेत धरण भरल्यानंतर वीज निर्मितीसाठी 612 क्यूसेक पाणी सोडले असून ते देखील खडकवासला धरणात जमा होत आहे.

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के भरल्यानंतर रविवारी रात्री दहा वाजता दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून 990 क्यूसेक वेगाने पाणी अंबी नदीत सोडण्यात आले.

आज (सोमवार) सकाळी मागील 24 तासात टेमघरला 54, पानशेतमध्ये 48, टेमघरला 51 मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला 86 टक्के, वरसगाव 87 तर टेमघर 41 टक्के भरले आहे. पानशेत धरण भरल्यानंतर वीज निर्मितीसाठी 612 क्यूसेक पाणी सोडले असून ते देखील खडकवासला धरणात जमा होत आहे. टेमघर धरणातून सकाळपासून 400 क्यूसेक पाणी सोडले आहे. अशा प्रकारे पानशेतचा विसर्ग, वीज निर्मितीसाठी, टेमघरचा विसर्गासह सुमारे 2000 क्यूसेक पाणी खडकवासला मध्ये जमा होत आहे.

तर खडकवासलामध्ये सकाळपासून 800 क्यूसेकचा येवा येत आहे. चार धरणात मिळून 25.05 म्हणजे 85.92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Pune news water released on Panshet Dam