'मोरया' अॅपच्या साह्याने श्री गणेशांचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

महापालिकेने जवळपास 25 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनाचे स्थळ निर्माण होते. या स्थळांची माहिती या ऍपवरून मिळत होती. यामुळे गणेश विसर्जन करण्यात भाविकांना बरीच मदत झाली.

नागपूर : श्री गणेशांचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केले. त्यामुळे अनेकांना विसर्जनाचे जवळचे स्थान कोणते, हे या ऍपच्या सहाय्याने माहीत झाले. नागपुरात ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली.

महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केला आहे. हा ऍप अँड्राईड फोन डाऊनलोड होऊ शकतो. नागपुरातील गांधीसागर, सोनेगाव व अंबाझरी या प्रमुख तलाव विसर्जनासाठी पूर्णपणे बंद असल्याने अनेकांना दुसऱ्या ठिकाणी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागले. महापालिकेने जवळपास 25 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनाचे स्थळ निर्माण होते. या स्थळांची माहिती या ऍपवरून मिळत होती. यामुळे गणेश विसर्जन करण्यात भाविकांना बरीच मदत झाली.

शहरात दुपारनंतर गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली. गणेश मंडळांचे मोठे गणपतींचे विसर्जन करण्यासाठी नागपुरात सायंकाळनंतर सुरूवात झाली. या सर्व गणेश मंडळाने वेळ ठरवून दिलेली असल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन फुटाळा तलावात केले जात आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. श्री गणेशांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन योग्यरितीने करण्यासाठी क्रेनचीही व्यवस्था विसर्जन स्थळी करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जनाचे काम सुरू होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी