किनो शिक्षक राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदीप भोसले यांना

एल. बी. चौधरी
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

किनो गौरव जिल्हास्तरीय पुरस्कार
वर्षा चौधरी (इगतपुरी), निलेश भामरे (कळवण), प्रदीप देवरे,(चांदवड), नामदेव बेलदार (त्रंबकेश्वर), विलास जमदाडे (दिंडोरी), देविदास शेवाळे (देवळा), विलास गवळे (नाशिक), प्रकाश चव्हाण (निफाड), ज्ञानदेव नवसरे (पेठ), देविदास कदम (सटाणा), हनुमंत काळे (येवला), गोरक्ष सोनवणे, (सिन्नर), वैशाली भामरे (मालेगाव), दीपक हिरे (मालेगाव), निलेश नाहिरे (मालेगाव) यांना जाहीर झाला आहे. 

सोनगीर (जिल्हा धुळे) : मालेगाव (सोयगाव) येथील किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे किनो शिक्षक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा किनो राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सरल प्रणालीचे राज्य मार्गदर्शक प्रदीप भोसले यांना जाहीर झाला आहे. 

आठ सप्टेंबरला दुपारी चारला अल कबीर इंग्लिश मीडियम स्कूल दरेगाव (मालेगाव) येथे शिक्षण व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. अशी माहिती किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख यांनी दिली. 

शिक्षक दिनानिमित्त पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा हे केवळ शासनाचे कार्य नव्हे तर सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणाऱ्या संस्थांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळत नाही. व त्यांच्या कार्याची माहिती होत नाही. हे जाणून किनो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रईस शेख यांनी संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू केला आहे.

तसेच खंडू मोरे यांच्या फांगदर शाळेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा म्हणून तर रवी जटीया, खडकी यांच्या शाळेला तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे संस्थापक मुश्ताक शेख व अध्यक्ष रईस शेख यांनी अभिनंदन केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर