पिलखोड येथे महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

दीपक कच्छवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सतीश ढिवरे यांने या महिलेचा डावा हात पिळून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पिलखोड येथे घरात एकटी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी मुख्य सहा व ईतर दहा ते बारा जणाविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे सोमवारी (ता. 11) एक महिला दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात एकटी होती. त्यावेळी गावातील सतिश ढिवरे, काळू ढिवरे, बापू ढिवरे, गोरख यशोद, बाबा यशोद, नाना जाधव, व इतर दहा ते बारा जण (नावे माहित नाही) यांनी हातात लाठ्या काठ्या घेवुन या महिलेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला.

यातील सतीश ढिवरे यांने या महिलेचा डावा हात पिळून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी या महिलेने दिलेल्या तक्ररावरून सतिश ढिवरे, काळू ढिवरे, बापू ढिवरे, गोरख यशोद, बाबा यशोद, नाना जाधव, व इतर दहा ते बारा जण (नावे माहित नाही) यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नजिंम शेख हे करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :