चाळीसगाव: बिबट्यासाठी वन विभागाने अखेर लावला पिंजरा

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

अधिकाऱ्यांनी केली पाहणी...
शनिवारी(ता. 19) रात्री वन विभागाच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात फोनवर सांगण्यात आले की, नांद्रा - सायगाव रस्त्यावर बिबट्या बसला आहे. त्यानुसार तहसिलदार कैलास देवरे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व वनकर्मचारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेल्या सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात काल (ता.20) दुपारी तीनला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. शिवाय दोन वन कर्मचारी रात्रभर त्या भागात गस्तीसाठी उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारपासून (ता. 15) सलग तीन दिवस सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत दोन महिला आणि एक मुलगी हल्ल्यात जखमी झाले आहेत. तसेच एक तरुण बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतात कोणी जाण्यास धजावत नाही. त्यामुळे या भागात पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने पिंजरा लावण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींच्या पुर्तता करुन काल(ता.20) दुपारी तीनला सायगाव शिवारात ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. यावेळी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे, मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे, वनरक्षक प्रकाश पाटील, पोलीसपाटील आबा शिंदे, वनकर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाकडून जी मदत शक्य आहे ती आम्ही पुर्णपणे करीत आहोत. फक्त ग्रामस्थांनी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहेत, असे संजय एस. मोरे ग्रामस्थांशी बोलतांना म्हणाले.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी...
शनिवारी(ता. 19) रात्री वन विभागाच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात फोनवर सांगण्यात आले की, नांद्रा - सायगाव रस्त्यावर बिबट्या बसला आहे. त्यानुसार तहसिलदार कैलास देवरे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व वनकर्मचारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तिथे तसे काही आढळून आले नाही. अधिकाऱ्यांनी रात्री पावणे एक पर्यंत नांद्रा, काकळणे, सायागाव शिवारात पाहणी केली. ज्या-ज्या भागात घटना झाल्या त्या-त्या ठिकाणी अधिकार्यांनी भेट देत ग्रामस्थांची विचारपुस केली. तसेच पुर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :