मोदींचे कोट विकले, तरी कर्जमाफी होईल: संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत? यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशीन आणले आहे का?

नंदुरबार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वापरलेले कोट विकले, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

नंदुरबारमध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. कालपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो, पण तीन वर्षांपूर्वी वाजत-गाजत सत्तेवर बसवले ते चोर निघालेत. आता त्यांच्याकडून हिशेब मागत आहे म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत आहे, असे म्हणत राऊत यांनी सरकारवर टीका केली.

राऊत म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत? यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशीन आणले आहे का?

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण अशी गत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी