नाशिक जिल्ह्यात कर्जाला कंटाळून शेतकऱयाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नाशिक: शिंदे गावातील शेतकरी नामदेव देवराम झाडे (65) यांनी कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली.

रविवारी (ता. 29) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरात विष घेतले होते. उपचारासाठी नातेवाईकांनी त्यांना नाशिक रोडला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान आज (सोमवार) त्यांचा मृत्यु झाला.

मृत झाडे यांच्यावर सोसायटीचे 35 हजार, मोटार वीज बिल 35 हजार असे एकूण 70 हजाराचे कर्ज होते. वर्षभरात त्यांनी पिकविलेल्या एकाही शेतमालाला भाव मिळाला नाही. त्यांची दीड एकर शेती असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. एक मुलगा रिक्षा चालक तर दुसरा तात्पुरती स्वरूपाची नोकरी करतो. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी (दि. 30) झाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :