कर्जमाफी हेल्पलाईन पहिल्याच तासाला 'होपलेस'

योगेश फरपट
बुधवार, 26 जुलै 2017

नेमके काय झाले 
घुसर येथील एका शेतकऱ्याने 1077 या हेल्पलाईन वर फोन केला असता शिपायाने उचलला, त्याने संवाद तर साधला मात्र कर्जमाफी बाबत काहीही माहिती नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. 

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्जमाफी योजना मदत केंद्राची 1077 या क्रमांकाची हेल्पलाईन पहिल्याच तासाला होपलेस झाल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन कार्यान्वित केली. त्याचा शुभारंभ विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचे हस्ते फित कापुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी झाला. मात्र संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हेल्पलाईनचा नंबर बंद होता. परत बुधवारी सकाळी 9 वाजता संपर्क केला असता फोन तर उचलल्या जात होता मात्र शेतकऱ्यांचे समाधान उपस्थित कर्मचारी करू शकत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

कारण केवळ औपचारिकता पूर्ण करून अधिकाऱ्यांनी कर्तव्य पूर्ती तर केली प्रत्यक्षात मात्र फलश्रुती मात्र शून्य आहे. 

नेमके काय झाले 
घुसर येथील एका शेतकऱ्याने 1077 या हेल्पलाईन वर फोन केला असता शिपायाने उचलला, त्याने संवाद तर साधला मात्र कर्जमाफी बाबत काहीही माहिती नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. 

काय झाला संवाद 
शेतकरी - नमस्कार साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयाचा हेल्पलाईन नंबर आहे ना
शिपाई - हो नैसर्गिक आपत्तीचा नंबर आहे
शेतकरी - शेतकरी कर्ज माफीची माहिती पाहिजे होती
शिपाई - नाही मला नाही माहीत, तुम्ही ऑफिसला या
शेतकरी - कोण देईल माहिती
शिपाई - जिल्हाधकारी साहेबांचे पीए
शेतकरी - धन्यवाद साहेब , ठीक आहे

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :