ग्रामपंचायत निवडणुकीची सुरुवात जबर मारहाणीने

शाहिद अली
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरावतीलाच ही मारहाण झाल्याची घटना आहे. अजून निवडणुकीत काय काय घडेल याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. द

पवनी (जिल्हा भंडारा) : पवनी तालुक्यातील बाचेवाडी येथे आज (ता. 5) ला मतदान करणार नसल्याचे बोलल्याने एका 30 वर्षीय युवकाला ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभे असलेल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे.

भंडारा जिल्हायातील ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रकिया आज पूर्ण झाली. आणि लगेच निवडणुकीचे पडसाद दिसू लागले. तालुक्यातील बाचेवाडी येथे सुनील सदगुरू रंगारी याने आपल्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रिंगणत उत्ताविले. तर त्याचा चुलतभाऊ सोमेश्वर जयदेव रंगारी (वय 30) हा दुसऱ्या पार्टीसोबत असल्याने त्याला आम्हाला मतदान करशील की नाही अशी विचरणा केली असता सोमेश्वर यांनी 'नाही' म्हटले. सुनील रंगारी, सोमेश्वर रंगारी व रोशन रंगारी यांनी जखमीला अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण व खाली पाडून केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरावतीलाच ही मारहाण झाल्याची घटना आहे. अजून निवडणुकीत काय काय घडेल याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मारहाणीत जखमीला पवनीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: bhandara news gram panchayat election clashes crime