बुलढाणाः खामगाव येथे मोठ्या रेशन माफियांवर कारवाई

श्रीधर ढगे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

हजारो क्विंटल गहू तांदूळ व रॉकेल जप्त

खामगाव (बुलढाणा) : जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्यात येत असून, दबंग म्हणून परिचित खामगाव शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी आज (शुक्रवार) मोठ्या रेशन माफियांवर कारवाई केली. या कारवाईत हजारो क्विंटल गहू व तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

खामगाव मधील वाडी भागात जेव्हा छापा टाकल्या गेला तेव्हा अवैध साठा पाहून पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी अवाक राहिले. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सर्रास सुरू होता, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

जयकुमार चांडक नावाच्या रेशन माफियाचा हा गोडावून असून, रेशन व बाजारातील माल एकत्र करून तो राज्यासह परप्रांतात पाठविला जात होता. या कारवाईत मोठे रेशन माफिया रॅकेट उघडकीस येऊ शकते. वृत्त लिहेपर्यंत पोलिस कारवाई सुरु होती. ठाणेदार उत्तमराव जाधव, तहसीलदार सुनील पाटील यांनी माल जप्त करून पंचनामा कारवाई सुरु केली आहे. गोडावून मध्ये माल मिक्स मशीन, रॉकेल साठा जप्त करून सदर गोडावून सील केला जाणार असल्याची माहिती आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर