बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी

शाहीद कुरेशी
गुरुवार, 29 जून 2017

गोळीबाराची ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले असून, रवी राजपूत यांच्यावर डाॅ. कोलते यांच्या रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत.

मलकापूर - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील घीर्णी रस्त्यावर महाराणा प्रतापनगर येथे रवी राजपूत यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला.

गोळीबाराची ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले असून, रवी राजपूत यांच्यावर डाॅ. कोलते यांच्या रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत. रवी राजपूत हे निपाना शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत. राजपूत यांना दोन गोळ्या लागल्या आहेत.

आरोपी फरार झाले असून, पोलिस शोध घेत आहेत. बुलडाणाचे जिल्हा पोलिस अधीक्षक शशी कुमार मीना मलकापूरकडे रवाना झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी